प्र.1 ते 3 साठी सूचना : पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून निवडा :
सर्वांच्या भल्याच्या या कल्पनेचा सुरूवातीला स्वप्नरंजन म्हणून उपहास करण्यात आला. कुठल्याही गोष्टीच्या जन्माच्या वेळी ती परिपूर्ण वा सुंदर असतेच असे नाही, बहुधा ओबडधोबड असेच तिचे रूप असते. आधुनिक तंत्राचा समजाव्यवस्थेसाठी खूपच उपयोग होणार आहे. सामाजिक कार्याच्या तळमळीत बासनातल्या कापूरवड्या हुंगवून चालणार नाही किंवा ती कल्पनाच स्वाहाकार करून हजम करता येणार नाही. विज्ञान, यंत्र-तंत्र आणि अहिंसक दिलेरीसाठी तो मंत्रही आहे. गावाने आपल्या नव्या पिढीला याचे दर्शन घडवून आणले पाहिजे. विज्ञानाने अमर्याद संधी उपलब्ध करून दिली आहे. ती आता कुणा जातीची वा कुळाची मालमत्ता राहिलेली नाही. आपल्या शेतीप्रधान देशात कोंडी करणारे, पुरातन बालेकिल्ले, तट पुष्कळ अंशी ढासळले आहेत, तरी त्याची चाहूल लागली आहे खास. पण शेतकऱ्यांची प्रगती केवळ समाजवादी घोषणांनी किंवा मतपत्रिकेच्या चित्रावर ठप्पे लावून होणार नाही. त्या शाईच्या फुल्या नवी व्यवस्था आणू शकत नाहीत. विज्ञानाची जोड असलेली तळमळ हीच आपल्या शेतीप्रधान देशाला तारून नेईल. तेथेच मतपेटीतून जन्मलेल्या नव्या नेतृत्वाला वाव मिळणार आहे.
प्र. 1 आपल्या शेतीप्रधान देशाचा तारणहार कोणास म्हटले आहे ?